रत्नागिरी:- कोरोना काळात पेट्रोल दरवाढ,गॅस ,अन्नधान्य यामधील दरवाढीचा निषेध करण्यासाठी तत्कालीन जिल्हाध्यक्ष कै. ॲड.विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन कार्यालय रत्नागिरी व पेट्रोल पंप येथे केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला होता.
असा समज करून पोलीस प्रशासन यांनी गुन्हा दाखल केला होता.
त्याचा कोर्टामध्ये चालू असलेल्या केसचा निकाल काँग्रेस कार्यकर्ते यांच्या बाजूने लागला. सदर केस मध्ये ॲड. विजयराव भोसले, अशोक जाधव ,दीपक राऊत,कपिल नागवेकर, सचिन मालवणकर ,रूपाली सावंत, सुस्मिता सुर्वे, रिजवाना शेख,तेजश्री गोतम यांचा समवेश होता. संशयितांच्या वतीने ॲड अश्विनी आगाशे यांनी निःशुल्क पाहिले. त्यांचे उपस्थित कार्यकर्त्यांनी आभार मानले व केस मधून सुटल्या बद्दल आनंद व्यक्त केला