खेड / प्रतिनिधी:-
वेरळ खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपाच्या बाहेर बिल देण्यावरून झालेल्या बाचाबाचीत एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश प्रकाश जाधव व त्यांचा मुलगा प्रथमेश एकनाथ जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक असून खोपी फाटा येथील हॉटेल गणेश कृपा येथे दारू पिण्यासह जेवणासाठी गेले होते. फिर्यादीने बिल दिले असता तिघांमध्ये बाचाबाची झाली. तिघांनी फिर्यादीस डोक्यात रॉड घालून गंभीर जखमी केले. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.