रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील 7 वर्षीय मुलीसोबत लैगिक गैरकृत्य करणाऱ्याला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास व 14 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी. मंगेश एकनाथ कदम (41, ऱा आंगवली ता. संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आह़े. त्याच्याविरूद्ध देवरूख पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होत़े.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विषेश पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. सरकार पक्षाकडून ऍड़ मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े. गुन्ह्यातील माहितीनुसार 14 मार्च 2021 रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास आरोपी मंगेश हा पिडीत 7 वर्षीय मुलीला आपल्या घरी बोलावून घेतल़े. यावेळी मंगेश याने पिडीत मुलीसोबत लैंगिक गैरकृत्य केल़े असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होत़ा.
घडला प्रकार पिडीत मुलीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर ही बाब उघड झाल़ी. त्यानुसार पिडीतेच्या पालकांनी देवरूख पोलीस ठाण्यात मंगेश कदम याच्याविरूद्ध तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी मंगेश याच्याविरूद्ध भादंवि कलम 354 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) चे कलम 3 (सी), 4,8,9 (एम), 10 प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा तसेच यापकरणी तपास करून मंगेश याच्याविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े. खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून एकूण 11 साक्षिदार तपासण्यात आल़े. न्यायालयापुढे मंगेश याच्याविरूद्धचे आरोप शाबीत झाल्याने त्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावल़ी. खटल्यादरम्यान न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून देवरूख पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल वर्षा चव्हाण यांनी काम पाहिल़े.