रत्नागिरी:- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येत्या शुक्रवारी (दि. १४ जुलै) मुंबई-गोवा महामार्गाची पनवेल ते रत्नागिरी या टप्प्याची पाहणी करणार आहेत.यावेळी नॅशनल हायवे ऑथोरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पाहणी दौरा सकाळी पावणेआठ वाजता पनवेल रेस्ट हाऊस येथून सुरू होणार असल्याची माहिती श्री. चव्हाण यांचे माध्यम समन्वयक गोविंद येतयेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत अत्यंत सजग असून महिन्या-दोन महिन्यांच्या अंतराने सातत्याने आढावा घेत आहेत. रस्त्याचे काम दर्जेदार आणि जलद व्हावे यासाठी संबंधितांशी वेळोवेळी चर्चा करत असल्याने कामाचा उरक अनुभवण्यास येत आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी निश्चितच सुखावले आहेत. गणेशोत्सवापर्यंत रस्त्याचे बरेचसे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याने शुक्रवार, दि. १४ जुलै रोजी या महामार्गाच्या पहाणीसाठी धावता दौरा करणार आहेत.
सदर दौऱ्यादरम्यान मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी तसेच निवेदने सादर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन व जिल्हा संघटन सरचिटणीस श्री. राजेश सावंत यांनी केले आहे.
मंत्री महोदयांचा मुंबई-गोवा महामार्ग पहाणी दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
शुक्रवार, दि. १४.०७.२०२३
• सकाळी ०६:०० वा. – पलावा, डोंबिवली निवासस्थान येथून वाहन क्र. एम.एच.-१, व्ही.एफ.-२५४२ (व्हाईट स्कॉर्पियो एन)ने पनवेलकडे प्रयाण.
• सकाळी ०७:३० वा. – पनवेल येथे आगमन व मुंबई गोवा महामार्गाच्या पहाणीस सुरुवात.
• सकाळी ०७:३० ते ०९:४५ वा. – पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या कामाची पहाणी. (८४.०० कि.मी.)
• सकाळी ०९:४५ ते १०:१५ वा. – इंदापुर ते वडपाले पॅकेज-१ ची पहाणी. (२६.७५ कि.मी.)
• सकाळी १०:१५ ते ११:१५ वा. – वडपाले ते भोगाव खुर्दे पॅकेज-२ ची पहाणी. (३८.७६ कि.मी.)
• सकाळी ११:१५ ते १२:०० वा. – भोगाव खुर्दे ते कशेडी पॅकेज-३ ची पहाणी. (१३.६०० कि.मी.)
• दुपारी १२:०० ते ०१:०० वा. – कशेडी ते चिपळूण पॅकेज-४ ची पहाणी. (५०.०० कि.मी.)
• दुपारी ०१:०० ते ०१:४५ वा. – चिपळूण येथे राखीव
• दुपारी ०१:४५ ते ०२.१५ वा. – चिपळूण ते आरवली पॅकेज-५ ची पहाणी. (२५.०० कि.मी.)
• दुपारी ०२:१५ ते ०३:१५ वा. – आरवली ते कांटे पॅकेज-६ ची पहाणी. (४०.०० कि.मी.)
• दुपारी ०३:१५ ते ०४:१५ वा. – कांटे ते वाकेड पॅकेज-७ ची पहाणी. (५१.०० कि.मी.)
• दुपारी ०४:१५ ते ०५:०० वा. – वाकेड ते तळगाव पॅकेज-८ ची पहाणी. (३३.०० कि.मी.)
• सायं. ०५:०० ते ०६:०० वा. – तळगाव ते कळमठ पॅकेज-९ ची पहाणी. (३८.०० कि.मी.)
• सायं. ०६.०० ते ०७.०० वा. – कळमठ ते झाराप पॅकेज-१० ची पहाणी. (४४.०० कि.मी.)
• सायं. ०७.०० वा. – झाराप, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव
• रात्री ०८:०० वा. – सिंधुदुर्ग येथून दाबोलिम विमानतळ, गोवाकडे प्रयाण
• रात्री १०:१५ वा. – दाबोलिम विमानतळ, गोवा येथे आगमन व राखीव
• रात्री ११:१० वा. – एअर इंडिया फ्लाईट क्र. AI-६९७ ने मुंबईकडे प्रयाण
शनिवार, दि. १५.०७.२०२३
• ००.२० वा. – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल-२), मुंबई येथे आगमन व पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.