कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघातर्फे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन
नवी मुंबई:-गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांना अतिरिक्त डबा जोडण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघातर्फे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,कोकणात गणेश चतुर्थी म्हणजे चाकरमानी यांचा महोउत्सवच होय.वर्षभर आपला काम धंदा सांभाळत आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाकरमानी यांचा गणेशोत्सव हा एक मोठ्या महान उत्सवा सारखाच असतो. त्यामुळेच चाकरमनी सर्व कुटुंब सहपरिवारासह मिळेल त्या वाहनाने (बस, एसटी, खाजगी वाहन याप्रमाणे) आपल्या मूळ गावी जात असतात.
त्यातच कोकण रेल्वे सेवेचा सर्रास बराच मोठ्या प्रमाणात कोकणवासिय रेल्वे प्रवासाचा लाभ घेतात. त्यातच सालाबाद प्रमाणे तुफान प्रचंड गर्दीचा अनुभव घेतात. भारतीय रेल्वेतील मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर दैनंदिन गाड्यां व्यतिरिक्त अधिक विशेष गाड्यांची मोठ्या संख्येने सेवा दिली आहे.
व तसेच पुढे म्हटले आहे की महोदय, कोकण रेल्वे मार्गावर आरक्षित तिकिटे चार महिने अगोदर आगाऊ तिकीट उपलब्ध नियमानुसार काही मिनिटातच हाऊसफुल होत ३०० ते ४०० प्रवासी प्रतीक्षा यादी नोंदवली गेली. तसेच अतिरिक्त अधिक विशेष गाड्यांचा सेवेचा लाभ घेत कोकणवासी यांनी याही गाड्यांच्या आगाऊ तिकीट सेवेत काही प्रमाणात पुष्टी झालेल्या असल्या तरी, बराच कोकण प्रवासी वर्ग प्रतीक्षा यादीत आहे. तरी महोदय, या प्रकारच्या सेवेत दैनंदिन तसेच अतिरिक्त अधिक विशेष गाड्यांना कोकणवासीय आगाऊ तिकीट सेवेत मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा यादीत आहेत. तरी कोकणवासी यांच्या प्रचंड आणि मोठ्या प्रमाणाच्या मागणीनुसार प्रतीक्षा यादीतील प्रवाशांच्या तिकिटांची पुष्टी (कर्न्यम्) होत असेल / नसेल तरी सदर सेवेतील गाड्यांच्या आरक्षित अतिरिक्त बोगीची अधिक मागणी करीत सदर गाड्यास अतिरिक्त आरक्षित बोगी संख्या (ज्या गाड्यांस १५ ते १८ बोगी आहेत. त्या गाड्यांना बोगी) जोडणी करावी. नुसार, प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना सदर गाडीतील अतिरिक्त आरक्षित बोगीत पुष्टी (Confirm Ticket) करीत सेवेचा लाभ घेता येईल..
तरी महोदय, या निवेदनाचा गांभीर्याने विचार करीत कोकण रेल्वे मार्गावरील दैनंदिन तसेच अधिक विशेष गाड्यांच्या बोगींच्या संख्येत वाढ करीत (१५ ते २२ बोगींत) २३ ते २४ बोगींची रचना करावी. जेणेकरून आगाऊ तिकीट सेवेतील प्रवाशांच्या प्रतीक्षा यादींची अतिरिक्त बोगीत तिकिटांची पुष्टी (Confirmed) करण्यात यावी.
हे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे त्याच बरोबर रेल्वे वरिष्ठ मंडळ मुंबई यांनाही देण्यात आले आहे.