रत्नागिरीतील एका अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा
खेड:- तालुक्यातील बहीरोली खाडी व दिवा बेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू उत्खनन होत असल्याने भर पावसाळ्यातही वाळू व्यावसायिकांना अभय कोणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सक्शन पंपाच्या माध्यमातून चोरटी वाळू उत्खनन केले जात आहे. एवढे होत असतानाही महसूल खाते मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
दरम्यान चिपळूण तालुक्यातील करबोने व मालदीवली या ठिकाणी दोन सक्शन पंप बसवण्यात आले आहेत तर त्यालाच लागून खेड तालुक्याची हद्दी म्हणून दिवाबेट या ठिकाणी शासनाची चोरी करणाऱ्या टोलक्याने सक्शन पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी रात्रंदिवस सहाशे ब्रास वाळू उत्खनन केले आहे, असे बोलले जात आहे. मात्र चिपळूण व खेड तालुक्यातील महसूल खात्याला याच काहीच देणं घेणं नाही ? मग या व्यावसायिकांना अभय तरी कुणाचे?
सक्शन पंप लावण्यासाठी न्यायालयाने बंदी घातलेली असताना न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसून चोरटी वाळू उत्खनन होत आहे.
शासनाने 600 रुपये ब्रास वाळू विकली जावी असे आदेश काढले असताना या वाळू चोरट्यांना भर पावसाळ्यात चांगले दिवस आले असल्याचे बोलले जात आहे. या व्यावसायिकांना रत्नागिरीतील अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. अधिकारी आपल्याला शेठ समजत असून या वाळू वाल्याचा दरबारामध्ये आपले हजेरी लावायची चर्चा देखील सुरू असते मात्र तो अधिकारी कोण? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.