रत्नागिरी:- राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत गुजरातच्या एका भाजपा नेत्याने मा. गुजरात न्यायालयात बदनामीचा खोटा आरोप करीत खटला दाखल केला होता या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने मा. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निकालाला मा. राहुल गांधी यांनी गुजरात जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवल्याने या विरुद्ध मा. गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी मा. गुजरात उच्च न्यायालयाने निकाल दिला असून मा. राहुलजींच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
भाजपा विरोधात बोलणार्यांवर खोटे खटले करुन त्यांची तोंड बंद करण्याची मोदी व शाहांची गुजराती स्टाइल देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पहात आहे. मा. राहुलजी गांधी यांनी मोदी आणि अडानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्याने त्याचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचाच प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
या विरोधात रत्नागिरी जिल्हा कांग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अविनाश जी लाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा कांग्रेस कमिटी च्या वतीने आज रोजी बुधवार दिनांक १२ जुलै रोजी कांग्रेस भवन रत्नागिरी येथे कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यान तर्फे मौन आंदोलन करुन भाजपा चा निषेध करण्यात आला.
रत्नागिरी कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, अनिरुद्ध कांबळे,सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोकराव जाधव, शहर अध्यक्ष रमेश शाहा, महिला प्रदेश सरचिटणीस श्रीमती रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी आगाशे, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष शराफत वागळे, बरकत काजी, रफीक मुल्ला, आतिफ साखरकर, रवि खेडेकर, सुश्मिता सुर्वे, रिजवाना शेख, काका तोडणकर, विश्वनाथ किल्लेदार, सागर कळंबटे, सुभाष डोर्लेकर, रघुनाथ आडिवरेकर, गजानन दळवी, केतन पेवेकर, तेजश्री गौतम, कपिल नागवेकर, सचिन मालवणकर उपस्थित होते.