नवी दिल्ली:-दिल्लीतील गीता कॉलनीतील उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते. बुधवारी (12 जुलै) सकाळी पोलिसांना याची माहिती मिळाली, यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हजर होत तपास सुरु केला. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक टीम देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या महिलेच्या शरीराचे अवयव आजूबाजूला विखुरलेले होते. महिलेचं वय 35 ते 40 वर्षं असल्याचा अंदाज
डीसीपी सागर सिंह कलसी यांनी सांगितल.
दोन पिशव्यांमध्ये आढळला मृतदेह
गीता कॉलनी उड्डाणपुलाखाली सापडलेला मृतदेह हा दोन बॅगमध्ये आढळून आला, मृतदेहाचे काही अवयव पिशवीबाहेर पडले होते. एका पिशवीमध्ये डोकं आणि दुसऱ्या पिशवीत शरीराचे इतर अवयव आहेत. लांब केसांवरुन हा मृतदेह तरुणीचा अथवा महिलेचा असल्याचं समजत.