खेड / प्रतिनिधी:-शहरातील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेस कर्जाच्या परताव्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कमलेश शेठ (रा. भरणे) यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 1 वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
शेठ यांनी श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेकडून 2018 मध्ये 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाच्या परताव्यापोटी धनादेश पतसंस्थेस दिला होता. हा धनादेश न वटल्याने पतसंस्थेच्यावतीने ऍड. सुधीर बुटाला, ऍड. समीर शेठ यांनी येथील न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र ऍड. समीर शेठ यांनी सुनावणी दरम्यान केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत प्रथम वर्ग नयायदंडाधिकाऱ्यानी 1 वर्ष साध्या कैदी शिक्षा सुनावली. याशिवाय 3 लाखाहून अधिक रक्कम भरण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.