रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल़ा तौसिफ आसिफ मिरजकर (36, ऱा गवळीवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े रत्नागिरी शहर पोलिसांनी तौसिफ याच्यासह तिघाजणांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली होत़ी.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबालकर यांनी या जामीन अर्जावर निकाल दिल़ा. सरकार पक्षाकडून ऍड़ अनिरूद्ध फणसेकर यांनी काम पाहिल़े. गुन्ह्यातील माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्यांबाबत गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार 14 मे 2023 रोजी 2च्या दरम्यान रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार हे रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील पार्सल गेटमधून पार्किंगकडे जाणाऱ्या रोडवर पेट्रोलिंग करीत जात असताना काही इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना आढळल़े.
या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतल़ी. त्यांच्याकडे घटनास्थळी एकूण 21.78 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमलीसदृश पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या स्थितीत सापडल़ा संदीप गोविंद शिवगण (रा. धनजीनाका, रत्नागिरी) आकीब खालीद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी), तौसिफ आसिफ मिरजकर (रा. राहुल कॉलनी, गवळीवाडा) अशी या संशयितांची नावे असल्याचे समोर आल़े. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. 128/2023 एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम 8(क), 22 (ब), व 29 अन्वये गुन्हा दाखल झाला होत़ा. न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले की, आरोपीला 14 मे 2023 रोजी अटक करण्यात आली आह़े तसेच गुह्याचे तपासकाम अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून दिसत आह़े. तौसिफकडे 8.17 ग्रॅम हेरॉईन आढळल्याचा आरोप असून तो विकीसाठी असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे नेंदवत आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल़ा.