चिपळूण: बेपत्ता झालेल्या प्रौढाचा तांबी नदीच्या पात्रात कळमुंडकरवाडी येथे सोमवारी मृतदेह आढळला. या प्रकरणी येथील पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सदानंद यशवंत चव्हाण (45, भोम) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. 5 जुलै रोजी सदानंद चव्हाण हा घरातून निघून कात्रोळी येथे त्याचे मामा विजय बाबुराव जाधव यांच्या घरी नदीपात्रातून चालत जात होते. यावेळी ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या बाबत 8 जुलै रोजी चिपळूण पोलीस स्थानकात ते बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्याचा शोध सुरु असताना सोमवारी तांबी नदीच्या पात्रात कळमुंडकरवाडी येथे मृतदेह आढळला.