रत्नागिरी:- अभयसिंह शिंदे इनामदार यांची मत्स्यव्यवसाय विभागाचे नूतन सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. याआधी ते मुंबई शहर येथे याच पदावर कार्यरत होते. महिनाभरापूर्वी रत्नागिरीच्या सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त पदी असणाऱ्या एन. व्ही. भादुले यांची पदोन्नतीने छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली. त्यानंतर या पदाचा कार्यभार मिरकरवाडा बंदर व व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी रत्नाकर राजम यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र आता या सहाय्यक मत्स्य आयुक्त पदावर अभयसिंह शिंदे इनामदार यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी कार्यभार स्वीकारला असून सोमवारपासून ते नियमित कर्तव्यावर हजर होणार आहेत.