रत्नागिरी:-रत्नागिरी पंचायत समितीने मागील 6 वर्षात घरकुल उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात चांगली कामगिरी बजावली आहे. वेळोवेळी पाठपुरावा केला जात असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेत योजनेचा लाभ मिळाला आहे. प्रधान मंत्री आवास योजनेतून 2016-17 ते 2021-22 या कालावधीत एकूण 861 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत 2016-17 ते 2021-22 या कालावधीत 589 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत 11 घरे बांधून पूर्ण झाली आहेत.
प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत 2016-17 साली 289 मंजूर घरे, त्यापैकी 288 घरे बांधून पूर्ण आहेत, तर 1 घर बांधावयाचे आहे. 2017-18 साली 52 मंजूर घरे, त्यापैकी 52 घरे बांधून पूर्ण झाली. 2018-19 साली 29 मंजूर घरे, त्यापैकी 29 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. 2019-20 साली 177 मंजूर घरे, त्यापैकी 177 घरे बांधून पूर्ण झाली. 2020-21 साली 75 मंजूर घरे, त्यापैकी 56 घरे बांधून पूर्ण झाली असून 19 घरे बांधावयाची आहेत. 2021-22 साली 307 मंजूर घरे, त्यापैकी 259 घरे बांधून पूर्ण झाली. तर 48 घरे बांधावयाची आहेत.
रमाई आवास योजनेंतर्गत 2016-17 साली 71 मंजूर घरे, त्यापैकी 71 घरे बांधून पूर्ण झाली. 2018-18 साली 208 मंजूर घरे, त्यापैकी 207 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. 1 घर बांधावयाचे आहे. 2018-19 साली 255 मंजूर घरे, त्यापैकी 249 घरे बांधून पूर्ण असून 6 घरे बांधावयाची आहेत. 2019-20 साली 36 मंजूर घरे, त्यापैकी 25 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तर 11 घरे बांधावयाची आहेत. 2021-22 साली 60 मंजूर घरे, त्यापैकी 37 घरे बांधून पूर्ण झालीत, 23 घरे बांधावयाची आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही नवीन योजना आहे. या योजनेंतर्गत 2021-22 साली 12 घरे मंजूर करण्यात आलीत, त्यापैकी 11 घरे बांधून पूर्ण झालीत तर 1 घर बांधावयाचे आहे.