भूमी अभिलेख कार्यालयातील शौचालयाची अशी अवस्था
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हाधिकारी कंपाऊंड वॉलमधील भूमी अभिलेख कार्यालयातील शौचालयाची अवस्था दयनीय झाली आहे. नुसते नावाला शौचालय आहे. शौचालयात मातीचा भराव एवढा जमा झाला आहे की एखादी व्यक्ती आतमध्ये जाऊन घसरून पडण्याची शक्यता आहे. शिवाय पाणी नसल्यामुळे शौचालयात दुर्गंधी पसरली आहे.
भूमी अभिलेख कार्यालयात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. जमिनिसंदर्भातील प्रकरणे अधिक असल्याने या ठिकाणी गर्दीही तेवढीच असते. परंतु या ठिकाणी शौचालयात जाण्याची हिंमत नागरिक दाखवत नाहीत. एवढी दुरावस्था झाली आहे. मातीचा भराव साचल्याने घसरून पडण्याची शक्यता असल्याने या शौचालयात जाताना घाबरत आहेत. तसेच पाणी नसल्याने दुर्गंधी येत आहे. या ठिकाणी स्वच्छ्ता करण्यासाठी शिपाई नसल्याने अजूनच दुरावस्था झाली. जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी लघुशंका आणि शौचसाठी जायचे कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.