शिवणेतील शेतकरी गोविंद भालेकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,संगमेश्वर पोलिसांना निवेदन
कारवाई करण्याची मागणी
संगमेश्वर:- तालुक्यातील शिवणे येथील शेतकरी गोविंद भालेकर या शेतकऱ्याच्या गाभण गायीला चुकीचं औषध दिल्यामुळे गाय दगावल्याचा आरोप भालेकर यांनी केला आहे. ज्या डॉक्टरने चुकीचे औषध दिले त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी भालेकर यांनी संगमेश्वर पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे ज्या गाभण गायीला औषध द्यायला नको होते ते देण्यात आले. त्यामुळे गाय दगावली ज्या डॉक्टरच्या चुकीमुळे माझे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले त्याच्यावर कारवाई करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात, माझे वय सुमारे ५२ वर्षे असून मी लहानपणापासुन दुधाचा व्यवसाय करीत आहे, मी सुशिक्षित बेकार असल्यामुळे नोकरी धंदा नसल्यामुळे तसेच मला व्यवसाय करणेची आवड असल्यामुळे हा व्यवसाय करीत आहे. माझ्याकडे जर्सी गाय गाभण होती. ती आजारी झाल्यामुळे त्या करीता गुरांचे डॉ. किशोर ढाकणे (संगमेश्वर) यांच्याकडे २२/०६/२०२३ रोजी तपासणीसाठी आणले होते. गाईचे तोंड दुखत असल्यामुळे कमी प्रमाणात खात होती, त्यांनी गाईची तपासणी करून गाईची एनर्जी वाढविणे व दात दुखणी कामी Calcimust Gel Advanse औषधे दिली, त्यानंतर दि. २५/०६/२०१२ रोजी डॉ. सुशिल उपाध्ये (देवरुख) यांना तपासणीसाठी आणले त्यानी देखील औषधे तसेच सलाईन व इंजेक्शन दिली, व Glucaboost हे औषध दिले, सदर औषध हे गाभण गाईला देता येत नाही तरी त्यांनी दिले. त्यामुळे या औषधामुळे माझी गाभण गाय मृत पावली. गाईचा मृत्यु हा डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रिटमेंटमुळे झालेला आहे असे म्हणत मला न्याय मिळवून द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यावर कोणती कारवाई करतात हे पाहावे लागेल.
संगमेश्वर पोलिसांनी चौकशी केली नाही : अशोकराव जाधव
साहेब सदर वरील अर्ज करणारे एक गरीब शेतकरी आहेत त्यांची गाय सुमारे दिवस भरात 9 लीटर दुध देत असे . 8 महिन्याची गाभण (प्रेग्नंट ) होती .गाईला चुकीची औषधे ( इंजिक्शेन ) दिले मुळे तिचा मृत्यू झाला आहे तरी सदर शेतकरी गोविंद भालेकर यांनी संगमेश्वर पोलिस स्टेशन ला कंप्लेट करावयास गेले असता फक्त अर्ज घेवून ठेवला आहे परंतू अद्याप चौकशी केली गेलेली नाही . आपणास विनंती आहे की आपण व्यक्तिशः लक्ष घालावे श्री भालेकर यांचे गाय डॉक्टरच्या चुकीच्या ट्रिटमेंट मुळे सुमारे 50 हजाराचे नुकसान झाले आहे आपण योग्यती चौकशी करून भालेकर याना न्याय मिळवून द्यावा ही विनंती .
आपला – अशोकराव जाधव. अध्यक्ष – शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य .