चिपळूण:-तालुक्यातील खेर्डी खेर्डी एम.आय.डी.सी.मध्ये 2 लाख 10 हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरीस गेल्याची घटना 7 जुलै रोजी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात चार अज्ञात चोरट्यांविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे झोपेत असताना चार अज्ञात चोरट्यानी खेर्डी एम.आय.डी.सी येथील कंपनीमधील दोन उघड्या रुममधून तसेच बंदिस्त असलेल्या कंपाऊंडमधील आवारातून 1 लाख किंमतीचे 100 किलो ऍल्युमिनिअयमचे कंडक्टर वायर बंडल, 50 हजार किंमतीचे 90-100 किलो कॉपर पट्टी, 15 हजार किंमतीचे डीपीचे तीन ते चार सेट, 20 हजार किंमतीचे ऍल्युमिनिअमचे लंग्स बॅकेट, 17 हजार किंमती डेल कंपनीचा लॅपटॉप, 8 हजार किंमतीचे विओ कंपनीचा मोबाईल असे 2 लाख 10 हजाराचा समावेश आहे.
हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची फिर्याद येथील पोलीस स्थानकाला दिली असून त्यानुसार चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.