रत्नागिरी:- शहरालगतच्या परटवणे ते साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला अवैधरित्या दारू पिणाऱ्यावर शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सय्यद मलिक शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े. रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद हा 9 जुलै 2023 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास परटवणे ते साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला बिस्लरीच्या बाटलीमध्ये दारू मिसळून पीत असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आल़े. त्यानुसार त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 84 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.