रत्नागिरी:- तालुक्यातील टिके येथे अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. ग्रामीण पोलिसांकडून रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आल़ी. संतोष गणपत सनगरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
टिके येथे सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होत़ी. याची दखल घेत पोलिसांकडून 9 जुलै 2023 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आल़ी. संतोष सनगरे याच्या ताब्यात 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांना आढळून आल़ी त्यानुसार त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू प्रतिबंध कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आल़ी.