संगमेश्वर/मकरंद सुर्वे:-देवरुख संगमेश्वर मार्गावरील संगमेश्वर येथे एका गाडीतून ६३ हजार रूपयांचा गुटखा संगमेश्वर पोलीसांनी जप्त केला आहे. हा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील कासारकोळवण येथील सुरेंद्र बगाराम मांगले (वय-४०) या इसमाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत संंगमेश्वर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवरूख- संगमेश्वर मार्गावरून संगमेश्वरच्या दिशेने गाडीतून गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या इसमाला संगमेश्वर पोलिसांनी काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ६३ हजाराचा गुटखा तसेच गुटखा विक्रीसाठी वापरण्यात येणारी गाडी असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. हा गुटखा घेऊन जाणाऱ्या सुरेंद्र बगाराम मांगले याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास संंगमेश्वर पोलीस करीत आहेत.