मुंबई – गोवा महामार्गावरील दुर्दशाबाबत तरूणाचा व्हिडिओ व्हायरल
रत्नागिरी:-मुंबई – गोवा महामार्गाचे काम मागील 12 वर्षांपासून रखडले आहे. यावर्षी सुरुवातीला म्हणण्यासारखा पाऊसही पडलेला नाही. तरीही रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत सध्या कोकणातील एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या तरूणाने कोकणातील राजकारण्यांवर आसूड ओढले आहेत.
काय आहे व्हिडिओ?
लांजा आणि राजापूर येथील मार्गावरून तरूणाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. तरूणाने व्हिडिओमधून रस्ता दाखवत हा रस्ता वाहन चालवण्याच्या लायकीचा आहे का? असा प्रश्न त्याने राजापूरच्या बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना केला आहे. लाज वाटते! ‘ महामार्ग म्हणायला, पायवाट म्हणायच्या लायकीचाही नाही’ हा महामार्ग अशा संतापजनक शब्दात आसूड ओढले आहेत.
तो पुढे म्हणतो, खड्डे, माती आणि पाणी यामुळे दयनीय अवस्था झालेल्या मार्गावरून वाहन चालवायचे कसे, तसेच रात्रीच्या वेळेस मार्गावर वाहन अडकून पडल्याचे ते बाहेर कसे काढायचे? गेल्या दहा – बारा वर्षांपासून एक लायकीचा रस्ता बनवता आला नाही, याची लाज वाटली पाहिजे.
लोकांना कोकणात यायचे असेल तर लोक कोल्हापूर मार्गे येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग म्हटला जाणारा हा रस्ता पायवाट पण शोभत नाही. आणि कोकणातील आमदार, खासदार या महामार्गावर टोलनाके मुलांना कसे मिळतील यासाठी योजना आखत आहेत.
कोकणी मानसाला हात जोडून विनंती आहे आत्तातरी तुमच्या हक्कांसाठी जागे व्हा. असे या तरूणाने विनंती केली आहे. सत्ताधाऱ्यांनी जशी मुंबई पाण्यात घातली त्याच पद्धतीने कोकण पाण्यात घालताहेत. कोकणातील लोकांना घरांना टाळे ठोकून मुंबईत जावे लागते त्याला हे राजकारणी कारणीभूत आहेत. आजही वेळ गेली नाही एकत्र या नाहीतर अजून दहा वर्षे हा महामार्ग होणार नाही असे या तरूणाने व्हिडिओत म्हटले आहे.