34 लाखांचे सोने,रक्कम जप्त
रत्नागिरी:- कोकण रेल्वेत चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत, पोलिसांनी चारजणांना अटक केली होती, तसेच त्यांच्याकडून तब्बल एक कोटीचे सोने आणि 50 हजारांची रोकड जप्त केली होती. आता याप्रकरणी बेळगावातून आणखी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून तीस लाख किंमतीचे सोने आणि चार लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संतोष शिरतोडे (रा. बेळगाव, कर्नाटक) असे या संशयिताचे नाव आहे. आता या प्रकरणात एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी संदीप वसंत भोसले (वय 40, रा. कवठे महाकाळ) व अक्षय राम चिनवल (वय 28, मूळ रा. खानापूर, बेळगाव) या दोघांना 28 जून रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर यामध्ये अर्चना मोरे (वय 42, रा. तलोजा, नवी मुंबई) हिचे नाव पुढे आले.
काय आहे प्रकरण
02 मे 2023 रोजी काणकोण रेल्वेस्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती. यावेळी तब्बल 4 कोटी रुपये किमतीचे 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञातांकडून चोरी करण्यात आली.
संपत जैन यांच्याकडे काम करणाऱ्या अशोक आर. यांनी याप्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणी तपास करत संशयितांना अटक करून सोने जप्त करत आहेत.