खेड/मनोज जाधव सर:- सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल हेदली- सवेणी ता.खेड जि.रत्नागिरी या माध्यमिक विद्यालयात नेहरू युवा केंद्र रत्नागिरी शाखा खेड व आपदा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मनोज जाधव सर यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी प्रथम नेहरू युवा केंद्र रत्नागिरी शाखा खेडचे प्रमुख श्री.संगम निकम, भागश्री चाळके, व आपदा मित्र मंडळाचे प्रमुख श्री.मनोज साळुंखे यांना पुप्षगुच्छ देऊन मुख्याध्यापक श्री.मनोज जाधव सर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर आपदा संस्थेच्या आपदा सखी अपुर्वा बांगरे, स्वाती मोरे, प्रणाली शिर्के, आरती सकपाळ यांना पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ.प्रविणा गुजर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रास्ताविका मध्ये श्री.विलास गुरव सर यांनी वृक्षारोपण करणे आज काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात, अथवा पडिक जागे मध्ये एक तरी झाड लावून त्याची जोपासना करणे गरजेचं आहे हे. समजावून सांगितले. तसेच आपदा संस्थेचे प्रमुख श्री. मनोज सांळुखे यांनी आपत्कालीन परिस्थिती मध्ये आपण नेमके काय करणे गरजेचं आहे. शिवाय आपत्कालीन परिस्थिती मध्ये आपण कशा प्रकारे एक दुसऱ्याना मदत करू शकतो या बाबत सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर विद्यालयाच्या परिसरात नारळी, पोफळी, कोकम, आवळा या वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी
नेहरू युवा केंद्र रत्नागिरी,खेड व आपदा मंडळाचे आपदा सखी, तसेच विद्यालयातील सहा.शिक्षिका प्रविणा गुजर, श्री.विलास गुरव सर, श्री.निलेश उतेकर सर, लिपिक श्री.गुजर शिपाई श्री.चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.