चिपळूण (ओंकार रेळेकर) एक सही संतापाची मनसेच्या या मोहिमेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत आपला संताप व्यक्त केला. पक्षाच्या आदेशानुसार वाहतूक सेना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने चिपळूण बहादूरशेखनाका येथे मोहीम राबविण्यात आली. यावेळी मतदारांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आपला संताप व्यक्त केला…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या विविध अंगीकृत संघटनांच्या वतीने एक सही संतापाची ही मोहीम राबवली जात आहे. राज्यात ज्यांना निवडून देण्यात आले आहेत. त्यांनी तर राजकारणाचा चिखल केला आहे. कोण कोणत्या पक्षात जाईल, हे सांगणे अवघड झाले आहे. चार वर्षात अनेक वेळा सत्ता बदल झाला आहे. मतदारांचा विश्वासघात केला जात आहे. मतदारांच्या मनातील संताप आता सह्याच्या रूपाने व्यक्त होऊ लागला आहे.
एकदा मतदान केले की तुम्हाला गृहीत धरणार? राजकारणाचा चिखल झाला आहे का ? असे प्रश्न करीत जर संताप होत असेल तर त्या संतापाची सही करून आपला संताप नोंदवा आशा पद्धतीची मोहीम मनसे राज्यात राबवत आहे. शनिवारी बहादूरशेख नाका येथे रत्नागिरी जिल्हा वाहतूक सेनेच्या वतीने आज राबवण्यात आली.बहादूरशेख नाका येथे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले, यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेनेचे तालुका संघटक मिलिंद कदम, तालुका रिक्षा संघटक राजेंद्र उंडरे,जेष्ठ रिक्षा चालक आनंद शिंदे दहिवली विभाग अध्यक्ष सुरेश घाग यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रदीप संसारे, मंगेश महाडिक, राहुल शिंदे, संजय भोसले, संजय वाजे, आभि धोत्रे,;प्रशांत हटकर, विठ्ठल दाते, रुपेश शेट्टे, निरंजय निर्मळ, मनोज कोलगे, गजानन राक्षे,राकेश शेट्टे, सागर गांधी, बाबराम महाडिक, संतोष मांडवकर,विजय सकपाळ,संजय जाधव,बाबू चौधरी,मिलिंद मोहिते आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.एक सही संतापाची या बोर्डवर आज दुपार पर्यंत दोनशे ते अडीचशे मतदारांनी सह्या करून आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेला बहादूरशेख येथे प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी स्पष्ट केले की मला माझ्या दैवताचा अभिमान वाटत आहे. या चिखलात आमचा नेता आणि आमचा पक्ष नाही सर्व पक्षानी राजकारणाचे वाटोळे केले आहे. म्हणूच एक वेळेला फक्त मनसेला सत्तेत बसवा बघा महाराष्ट्र राज्य कसे प्रगतीपथावर असेल आता आपण मतदारानी जागरूक होऊन मतदान केले पाहिजे. अन्यथा हे असेच सुरू राहील. या साठी मतदारांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन त्यानी केले.