रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीशांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत़. यामध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बिले, एऩ एस़ मोमीन, ड़ी एल़ निकम आदींचा समावेश होत़ा. याच्या जागी आता न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आह़े बदल्या करण्यात आलेल्या न्यायाधीशांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले न्यायाधीश रूजू झाले आहेत़.
नवनियुक्त न्यायाधीशांनुसार रत्नागिरी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून अनिल अंबालकर, चिपळूण जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून ए़ एस़ नेवासे, खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून एस़ एम़ देशपांडे आदींची नियुक्ती करण्यात आली आह़े तसेच विधी सेवा पाधिकरणचे सचिव ए़ एन कुलकर्णी यांची श्रीगोंदा अहमदनगर, खेड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ प़ी सदाफले यांची गडचिरोली येथे वरिष्ठ दिवाणी व मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आह़े, तर सदाफले यांच्या जागी गडचिरोली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एम़ व्ह़ी तोकले यांची नियुक्ती करण्यात आली आह़े. तसेच सह दिवाणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प़ी एस़ गोवेकर यांची सोलापूर येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आऱ ब़ी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आह़े.