कोकणात आगामी निवडणुका ठरणार लक्षवेधी
नवी मुंबई / उदय दणदणे:-महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्ष “बळीराज सेना” याची आज पक्ष अध्यक्ष तरूण तडफदार आक्रमक नेतृत्व अशोक वालम यांच्या अध्यक्षतेखाली, संघाध्यक्ष भूषण बरे साहेब व संघपदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक ९ जुलै,२०२३ रोजी गावस्कर हाॅल, दादर पूर्व,मुंबई येथे हजारो कार्यकर्त्यां समोर जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य उपाध्यक्ष पदी कृष्णा कोबनाक,सुरेश भायजे, सरचिटणीस पदी प्रकाश तरळ,संभाजी काजरेकर, नंदकुमार मोहिते,हर्षाली धाडवे,कोषाध्यक्ष- चिटणीस पदी मनोज पवार, उपनेते पदी रमेश कानावले,ॲड.चंद्रकांत कोबनाक, दत्ताराम घोगले, धनंजय किनगावकर, गणेश डांगे, किसन डीके, राजाराम ढोलम, संदीप तांबट, प्रभाकर धनावड़े,संतोष टक्के, चंद्रकांत कोकमकर,संजय गोंधळी, बबन कांबळे, सत्यजीत नार्वेकर, मनोहर पवार, सोनू शिवगण,आत्माराम बाईंत, संदीप गावडे, केशव भातडे, प्रथमेश गावणकर, देवळेकर,विश्वनाथ रक्ते, सखाराम माळी,ज्ञानदेव खांबे, हरिश्चंद्र पाटील, सखाराम पोटले, दत्ताराम मांडवकर, कृष्णा सुर्वे, महेश पारदुले, शांताराम जायगडे, प्रेमनाथ ठोंबरे, दयानंद चिंचवलकर , शांताराम जाधव, अनिल मोंडे, अनंत इरमल, संतोष निवातें, मानसी धनावड़े,रोहिणी साळवी,दशरथ डांगरे, वासुदेव साळवी, मनोहर घुमे, बबनराव उंड़रे , शिवाजी माईंन ,महेश पेंढारी, अनंत नाचरे, अशोक करंजे,मधुकर सोलकर, विजय मांडवकर, सूर्यकांत पागडे, राजेंद्र जोशी,महेश आंगने, अरविंद वजिरकर,किसन किंजले,सूर्यकांत पागडे, गणेश भगत, प्रकाश चांदीवडे,भास्कर कारे,विलास कांबळे,अंकुश रेवाळे, प्रताप सावंत, संतोष वारणकर,सुभाष हुमणे, अशा सर्व कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आल्यानंतर पक्ष अध्यक्ष. अशोक वालम यांनी मार्गदर्शन करताना संपूर्ण महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईत आगामी महानगर पालिका,जिल्ह्य परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणूकी करीता संघटन मजबूत करून सज्ज होण्यास आवाहन करण्यात आले आहे.