दापोली : तालुक्यामधील विसापूर येथे अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या 51 वर्षीय प्रवीण दाभोल याच्यावर दापोली पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक 7 जुलै रोजी प्रवीण दाभो हा विसापूर येथील एका नाल्याच्या पलीकडे निर्जन स्थळी असणाऱ्या घराच्या बाजूला पत्र्याच्या शेड खाली हातभट्टीची दारू तयार करत होता. दारू गाळण्याकरिता त्याने भट्टी बांधलेली होती. दारू गाळत असताना दापोली पोलिसांनी धडक कारवाई करीत सुमारे 26500 किमतीचा ऐवज जप्त केला. यामध्ये सुमारे 1500 रुपयाचे अल्युमिनियमचे भांडे, सफेद रंगाचे कॅन, 7,8 00 रुपये किमतीचे 50 लिटर मापाचे आल्युमिनियम बॉयलर , 500 रुपये किमतीचे बिसलरी बाटली सह फळांची गुळमिश्रित गाळलेली दारू, 12400 रुपये किमतीचे 12 लिटर मापाचे गुळ मिश्रित रसायन 4050 रुपये किमतीचे काळ्या रंगाच्या गुळाच्या ढेप, कापडी पिशव्या, 10 किलो सोललेली संत्रा फळे असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात पोलीस अंमलदार विकास पवार यांनी खबर दिली. आरोपी प्रवीण दाभो याच्यावर महाराष्ट्र दारू अधिनियम कलम 65(इ) नुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.