रत्नागिरी:-तालुक्यातील दांडेआडोम येथील जंगलमय भागात चालणाऱ्या अवैध गावठी दारूवर पोलिसांकडून छापा टाकण्यात आल़ा. शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी. या प्रकरणी एका संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून पोलिसांनी गावठी दारू हस्तगत केल़ी. संतोष कृष्णा मोरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेआडोम येथे अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार 8 जुलै 2023 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकण्यात आल़ा. यावेळी संशयित आरोपीच्या ताब्यात पोलिसांना अवैध गावठी दारू आढळल़ी. त्यानुसार त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65-ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा.