रत्नागिरीतील 2 शाळांचा समवेश
रत्नागिरी:- सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलेल्या महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्या शाळांचा विकास केला जाणार आहे. याकरिता राज्यातील 13 शाळांना 14 कोटी 30 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
त्याला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पर्यटन व सांस्कृतिक विभागाला निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून आठ जिल्ह्यांतील या 13 शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. लवकरच निधी वर्ग होणार आहे. यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. महापुरुषांनी जिथे शिक्षण घेतले अथवा अन्य कारणांनी त्या शाळा त्यांच्याशी संबंधित होत्या, त्या शाळांच्या रूपाने त्यांच्या कार्याची सदैव प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा विकस केला जाणार आहेत. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांशी संबंधित शाळांचा यात समावेश आहे. अमरावती तीन, सांगली, सातारा व रत्नागिरी प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे.
राजर्षी शाहू महाराज – जिल्हा परिषद शाळा हिंदुराव घाडगे विद्यामंदिर, कागल (1 कोटी 11 लाख 86 हजार), महात्मा फुले – ज्योती सावित्री इंटरनॅशनल, जिल्हा परिषद शाळा खानवडी जि. पुणे (1 कोटी 46 लाख 62 हजार), सावित्रीबाई फुले – जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक विद्यालय नायगाव जि. सातारा (1 कोटी 54 लाख 3 हजार), डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रतापसिंह हायस्कूल, सातारा (1 कोटी 25 लाख 87 हजार), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा क्र. 1 वाटेगाव जि. सांगली (1 कोटी 3 हजार), क्रांतिसिंह नाना पाटील नगर – जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, येडे मच्छिंद्र जि. सांगली (54 लाख 42 हजार), वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज -जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 पिंपळगाव बसवंत जि. नाशिक (1 कोटी 85 लाख 28 हजार), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चौंडी जि. अहमदनगर (2 कोटी 3 लाख 43 हजार), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – जिल्हा परिषद शाळा, मोझरी जि. अमरावती (55 लाख 68 हजार), संत गाडगेबाबा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव जि. अमरावती (49 लाख 68 हजार), शिक्षण महर्षी कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख – जि. प. प्राथमिक शाळा पापळ जि. अमरावती (1 कोटी 72 लाख 8 हजार), महर्षी धोंडो केशव कर्वे – जि. प. प्राथमिक शाळा मुरूड जि. रत्नागिरी (37 लाख 35 हजार), साने गुरुजी – जि. प. प्राथमिक शाळा पालगड जि. रत्नागिरी (3 कोटी 38 लाख 32 हजार).