रत्नागिरी:-रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार अश्रफ उर्फ अडर्या महमूद शेखचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सकाळी 6.20 वा जिल्हा शासकिय रुग्णालयात ही घटना घडली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विक्रिसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी अडर्या न्यायालयीन कोठडीत असताना त्याला रविवारी सकाळी 6 वा. श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले.