रत्नागिरी जिल्ह्यात मिळाला पहिला मान
संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई या छोट्याशा गावातील श्री अभिजीत मोहिरे यांच्या MasterMind Tech या युट्युब चॅनेल चे दहा लाख (1 Million) सबस्क्राईबर पूर्ण झाल्यामुळे युट्युब ने अभिजीत मोहिरे यांना गोल्डन प्ले बटन देऊन सन्मानित केले आहे.
अभिजीत मोहीरे यांचे मन लहानपणापासूनच गाड्या त्यांच्या आत मध्ये काय आहे ते खोलून बघणे इलेक्ट्रॉनिक उपकरणे खोलणे त्याच्या आत मधले टेक्नॉलॉजी समजून घेणे त्याला रिपेअर करणे मेंटेनन्स करणे यात फार रमायचे.
हाच छंद यांना फार पुढे घेऊन गेला इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल्स क्षेत्राचे त्यांनी खूप ज्ञान मिळवले गाडी कोणत्याही कंपनीची असो तिचा कोणताही प्रॉब्लेम असू दे अभिजीत मोहीरे ती ठीक करणारच.
ज्ञान हे वाटल्याने वाढत असतं असं म्हणतात, अभिजीत मोहोरे यांनी हे ज्ञान आहे ते स्वतःपर्यंतच मर्यादित न ठेवता त्यांनी युट्युब चॅनेल काढले व गाड्यांचा मेंटेनन्स असू दे , मेजर मेजर इशू असू देत किंवा इंजिनचे संपूर्ण काम असू दे त्यांनी हे सर्व आपल्या व्हिडिओतून लोकांना दाखवले त्यामुळे अनेक लोकांचे ज्ञान वाढत गेले ते स्वतः काम करू लागले आपल्या गाडीचा स्वतः मेंटेनन्स करू लागले अभिजीत मोहिरे यांच्याकडे लोक हजार हजार किलोमीटर दूरवरून आपली गाडी रिपेअर करण्यासाठी येऊ लागली.
अभिजीत मोहिरे यांना गाड्यांची व त्याचे काम करण्याची प्रचंड आवड आहे आणि ते कोणतेही काम एकदम परफेक्ट करण्यावर जास्त भर देतात.
यांच्या या छंदामुळे मास्टर माईंड टेक हे चॅनेल जगभर प्रसिद्ध झाले आहे तसेच कडवई सारख्या छोट्याशा गावाचे नव्हे तर पूर्ण रत्नागिरीचे नाव हे जगभर पोचले आहे.