रत्नागिरी/प्रतिनिधी:-जखमी अवस्थेत सापडलेल्या दोन कासवांना वनविभागाने शुक्रवारी रत्नागिरीच्या समुद्रात जीवदान दिले आहे. यातील एक कासव हे जवळपास 40 वर्षांच आहे. एक कासव हे 20 वर्षांचे होते.
पंधरा दिवसांपूर्वी वनखात्याला गणपतीपुळे आणि जुवे समुद्र किनारी ही दोन कासव जखमी अवस्थेत आढळून आली होती. जखमी अवस्थेत सापडलेल्या या दोन कासवांवरती उपचार सुरू होते. त्यादरम्यान मत्स्य विभागाने या कासवांची देखभाल केली. त्यांना वन विभागाच्यावतीने शुक्रवारी पुन्हा समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावरून ही दोन कासव सुरक्षित समुद्रात झेपावली.