रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड विभागादरम्यान शुक्रवारी मालमत्ता देखभालीच्यां कामासाठी घेण्यात आलेल्या 3 तासांचा मेगाब्लॉकमुळे रेल्वेगाड्यों वेळापत्रक पुरते बिघडले. 11 रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होवून प्रवाशांना रखडपट्टीला समोर जावे लागले. मंगळूर-उधना स्पेशल 5 तास 35 मिनिटे तर एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस साडेचार तास उशिराने धावली.
09058 क्रमांकाची मंगळूर-उधना स्पेशल 5 तास 35 मिनिटे विलंबाने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. 10103 क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस 1 तास तर 10104 क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस 58 मिनिटे उशिराना मार्गस्थ झाली. 10105 क्रमांकाची दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस 1 तास तर 10106 क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर 2 तास 11 मिनिटे उशिराने धावली. 11099 क्रमांकाची एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस तब्बल 4 तास 33 मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशाचा खोळंबा झाला. 12134 क्रमांकाची मंगळूर-सीएसएमटी एक्सपेस 56 मिनिटे तर 12431 क्रमांकाची तिरूअनंतपूरम-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 51 मिनिटे विलंबाने धावली. 12618 कमांकी निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सपेस 1 तास 20 मिनिटे तर 16345 क्रमांकाची एलटीटी-तिरूअनंतपूरम नेत्रावती एक्सपेस 1 तास 18 मिनिटे खोळंबली.
या पाठोपाठ 20910 क्रमांकाची कायुवेली एक्स्प्रेस 2 तास 22 मिनिटे तर 22907 क्रमांकाची मडगाव-हापा स्पेशल 1 तास उशिराने रवाना झाली. वीर-खेड विभागादरम्यान 3 तासांया घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे वेळापत्रक विस्कळीत होवून प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागले. वीर ते खेड विभागादरम्यान शुक्रवारी सकाळी 12 वाजून 20 मिनिटांनी घेण्यात आलेला मेगाब्लॉक दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी संपुष्टात आला. या मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या 11 रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होवून प्रवाशांचा खोळंबा झाला.