खेड / प्रतिनिधी:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर दोन ट्रेलरना धडक देवून अपघात केल्यापकरणी ट्रेलर चालक रवींद्र सुग्रीवकुमार याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेलर चालक चंदुलाल कांता बिंदू हा ट्रेलर घेवून गोवा येथून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रेलर घेवून जाणाऱ्या रवींद्र सुग्रीवकुमार याने हलगर्जीपणाने ट्रेलर चालवत बिंदू याच्या ट्रेलरला धडक देवून अपघात केला. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.