जाकादेवी/ वार्ताहर-चिपळूण तालुक्यातील भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डे येथील (B.ED) विद्यार्थिनी आणि गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कालकथित श्री.विश्वास शंकर माने यांच्या धाकट्या सुनबाई सौ. प्रियांका मयुरेश माने रा. सावर्डे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२३ (सेट ) उत्तीर्ण झाल्या आहेत.
या देदीप्यमान यशाबद्दल सौ.माने यांचे प्रबुद्ध विचार मंच सावर्डे यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन त्यांचा प्रेरणादायी सत्कार करण्यात आला. भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची विद्यार्थिनी सौ.प्रियांका मयुरेश माने या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट २०२३ )उत्तीर्ण झाल्या आहेत.
सौ.प्रियांका मयुरेश माने या सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला शैक्षणिक आलेख चढता ठेवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. सौ. माने यांचे सध्याचे M.A. D.ED, B.ED तसेच टीईटी पेपर १ आणि टीईटी पेपर २ आणि सेट (मराठी) २०२३ अशी शैक्षणिक अर्हता आहे. सौ. माने यांचे संपूर्ण चिपळूण सह जिल्हातून अभिनंदन करण्यात आले.