निसर्गप्रेमी शौकत मुकादम यांचे मार्गदर्शन
चिपळूण:विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड व पर्यावरण,पाण्याचे नियोजन तसेच प्लॉस्टिकमुळे भविष्यात होणारा धोका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृता निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थी कृषी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.याच धरतीवर दि.०५ जुलै रोजी रिगल कॉलेज कोंढे येथे विद्यार्थी कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
रिगल कॉलजचे चेअरमन संजयराव शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा मेळावा पार पडला यावेळी माजी सभापती पुजाताई निकम,तालुका कृषी अधिकारी राहुल अडके,चिपळूण नगरपरिषदचे मुख्य अधिकारी प्रसाद शिंगटे,वनक्षेत्रपाल राजेश्री किर,पोलिस निरिक्षक रविंद्र शिंदे,पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमोल पाटील, वनपाल दौलत भोसले,वनरक्षक राहुल गुंड,मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार आवले,कोंढे गावचे सरपंच माधवी कुळे, उपसरपंच हसन खान,मंडळ अधिकारी उत्तम जाधव,तलाटी सतीश जाधव,ग्रामसेवक दादासाहेब माने,ग्रामपंचायत सदस्य दिलीप कुळे,अशा अनेक मान्यवरांनी वृक्ष लागवड व पर्यावरण विषयी मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते तसेच सरफराज मुकादम,ओंकार सकपाळ,वसिम मुकादम,विकास जोरवेकर,प्रा.विनिता जोशी,प्रा.वैशाली भोसले,प्रा. अजिंक्य शिंदे, हे उपस्थित होते. या मेळावामध्ये नारळ,आंबा अशा प्रकारच्या रोपांचे वाटप करण्यात आले.शेवटी विद्यालयाचे मंदार आवले यांनी सर्वांचे आभार मानले.