रत्नागिरी प्रतिनिधी / कारवांचीवाडी येथे वृद्धाचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.पांडुरंग गोविंद लोहदे (७२) रा.कारवांची वाडी पोलिस स्टेशन जवळ असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.ते बेडवरून उठले नाही म्हणून फिर्यादी यांनी जवळ जाऊन पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत दिसून आले.
याबाबत फिर्यादी यांनी माहेर संस्था खेदशीचे व्यवस्थापक अभिजित कांबळे यांना सांगितले.त्यांनी येऊन पाहिले असता पांडुरंग लोहडे हे बेशुद्ध अवस्थेत आढळले.त्यांना उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.ही घटना 5 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता घडली.पोलिस स्थानकात आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.