गणपतीपुळे/वैभव पवार:-रत्नागिरी तालुक्यामधील स्वयंभू तीर्थस्थान असणाऱ्या गणपतीपुळे गावामध्ये आपटातिठा ते मनूताईचा पार या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सांडपाण्यासाठी लाईन टाकताना खोदलेला रस्ता पूर्णपणे ढासळला असून अनेक ठिकाणी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला दिसत आहे.
मात्र याकडे नाही स्थानिक प्रशासनाचे लक्ष किंवा सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागात असून त्याकडे त्यांचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. याच रस्त्यावरून हजारो गाड्या ये- जा करत असतात .मात्र या खचलेल्या रस्त्यातूनच त्यांना मार्गक्रमण करावा लागतो एखादा मोठा अपघात झाल्यानंतर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील वाहनधारकांना पडला आहे.
एकूणच संबंधित स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्र येऊन सदर रस्ते बाबत रस्ते खचले असल्याचे बोर्ड लावावे असे मत येते व्यक्त केले जात आहे . सदरचे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केले त्याला तातडीने बोलावून सदरचा खचलेला रस्ता दाखवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गणपतीपुळे येथील ग्रामस्थांकडून सुरू आहे तसे न झाल्यास तिथे काही दिवसांतच गणपतीपुळे येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. तरी संबंधित सार्वजनिक विभाग यांनी यामध्ये लक्ष घालून त्वरित सदरची साईट पट्टी वेळीच व्यवस्थित करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.