संगमेश्वर: मुंबई – गोवा महामार्गावरील आरवली येथे बोलेरो पीकअप गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. या अपघात प्रकरणी बोलेरो चालक संतोष शिवाजी पवार (३२, साईनगर नावडी, संगमेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पवार हा आपल्या ताब्यातील बोलेरो घेऊन संगमेश्वर ते गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी आरवली येथे आल्यावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सूरज सतीश सावंत (३५) हा तरुण जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल न करता बोलेरो चालक पवार हा तेथून निघून गेला. या अपघात प्रकरणी संतोष पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.