रत्नागिरी:- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या पंच प्रशिक्षण शिबिराला आज प्रारंभ झाला. साळवी स्टॉप येथील हॉटेल प्रसादमध्ये हे प्रशिक्षण सुरू झाले आहे.प्रशिक्षणासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर येथून पंच आलेले आहेत.
मुकुंद मंडले आणि गणेश चऱ्हाडे हे बीसीसीआयचे पंच प्रशिक्षण देत आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव बिपिन बंदरकर, उपाध्यक्ष दीपक देसाई, सहसचिव बालाराम कोतवडेकर, अमित लांजेकर उपस्थित होते.