नवी दिल्ली:- शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ‘ऊर्जादाता’ व्हावे ही आमच्या सरकारची मानसिकता आहे.आता सर्व वाहने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉलवर चालतील अशी दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
गडकरी हे राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलत होते.
60% इथेनॉल आणि 40% वीज वापरली गेली तर पेट्रोल 15 रुपये या किमतीपर्यंत पेट्रोल मिळेल. यामुळे लोकांना देखील याचा खूप फायदा होईल असंही गडकरी यावेळी म्हणाले. प्रदूषण आणि आयात कमी होईल. 16 लाख कोटी रुपयांची आयात आहे, हा पैसा शेतकऱ्यांच्या घरी जाईल.
ते म्हणाले की, भारतमाला कार्यक्रमांतर्गत सध्या सुरू असलेल्या दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने जयपूर ते दिल्ली हे अंतर फक्त दोन तासांचे होईल. जयपूर ते दिल्ली एक्सप्रेस हायवेचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून दसऱ्याच्या पुढेही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते पूर्ण होताच, जयपूर ते दिल्ली प्रवास करणे खूप सोपे होईल.
कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा साधत मंत्री म्हणाले की, काँग्रेसने भारतावर जवळपास 60 वर्षे राज्य केले आणि गरीब हटाओचा नारा दिला, मात्र गरिबांची गरिबी हटली नाही, उलट काँग्रेसवाल्यांनी त्यांची ‘गरिबी’ हटवली.गडकरी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच भारताला जगातील महासत्ता बनवेल. राजस्थानमध्ये 3 लाख कोटी रुपयांचा महामार्ग बांधला जात आहे. माणूस त्याच्या जातीमुळे मोठा नसतो, तो त्याच्या गुणांपेक्षा मोठा असतो, असे ते यावेळी म्हणाले.