– मुन्ना देसाई, बाबू म्हाप यांचा समावेश
रत्नागिरी:- उबेद होडेकर हल्ला प्रकरणात संशयितांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर हुल्लडबाजी करत मिरवणूक काढल्याचा आरोप असलेल्या 12 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 21 ऑगस्ट 2019 रोजी मारूती मंदिर ते हातखंबा अशी मिरवणूक काढण्यात आली होती या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांकडून कारवाई करत गुन्हा दाखल केला होत़ा. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. आरोपिंच्यावतीने ऍड़. मच्छिंद्र आंब्रे यांनी काम पाहिल़े. शहरालगतच्या उद्यमनगर येथे उबेद होडेकर यांच्यावरील हल्ला प्रकरणात मुन्ना देसाईसह इतर आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होत़ी. सुमारे 11 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर मुन्ना देसाई याची सुटका होताच त्याच्या समर्थकांनी जल्लोष केला होत़ा. तत्कालीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह, संशयितांच्या समर्थकांची मोठी गर्दी जिल्हा विशेष कारागृहाबाहेर जमली होत़ी. मुन्ना देसाई जेलमधून बाहेर येताच जल्लोष करण्यात आल़ा. यावेळी उत्साही समर्थकांनी हार घालून त्यांचे भव्य स्वागत केल़े. ‘कोण आला रे कोण आला, हातखंब्याचा वाघ आला’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्य़ा. तसेच दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या ताफ्यासह मुन्ना देसाई याची हातखंबापर्यंत मिरवणूक काढण्यात आल़ी. यावेळी गाड्यांचे हेडलाईट, इंडिकेटर चालू ठेवून रस्त्यावर धिंगाणा घालण्यात आल़ा. जोरजोरात गाड्याचे हॉर्न वाजवण्यात येत होत़े. तसेच उत्साही कार्यकर्ते किंचाळून, रस्त्यावर आरडाओरडा करत होत़े. या सर्व घटनेचे छायाचित्रण करून पोलिसांनी 12 जणांविरूद्ध भादंवि कलम 143, 147, 149, 279, 336 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3)चा भंग 135,110,112/117 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184,66/192,122/177,190(2) प्रमाणे गुन्हा दाखल केल़ा. सर्व आरोपींना अटक करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होत़े.
आरोपींमध्ये महेश उर्फ बाबू म्हाप (49,ऱा हातखंबा रत्नागिरी), केदार मधुसुदन उर्फ मुन्ना देसाई (44, ऱा गुरववाडी हातखंबा), सागर प्रभात मापुसकर (37, ऱा हातखंबा रत्नागिरी), पर्शुराम मारूती कदम (42, ऱा हातखंबा कदमवाडी), मोरेश्वर दीपक कासारे (36, ऱा हातखंबा रत्नागिरी), सचिन सुधाकर शेट्ये (47, ऱा हातखंबा रत्नागिरी), शिवानंद नंदकुमार जठार (46, ऱा हातखंबा रत्नागिरी), संतोष दत्तूसिंग रजपुत (36, ऱा पानवल रत्नागिरी), करण सुनील सनगरे (26, ऱा हातखंबा सनगरेवाडी), ऋषीकेश शंकर गावडे (24, ऱा हातखंबा तायरेवाडी), ऋषीकेश श्रीकांत तोडणकर (41, ऱा हातखंबा, रत्नागिरी), अरूण बाबू झोरे (42,ऱा टीआरपी रत्नागिरी) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत.