चिपळुणातील घटना
चिपळूण:- वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी केलेल्या साडीला रिफंड देतो सांगून महिलेची दीड लाखाची फसवणूक केल्याची घटना मार्गताम्हाणे येथे घडली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञातांनी फिर्यादी यांच्या पत्नीने saarivip.com वरून ऑनलाईन खरेदी केलेल्या साडीला रिफंड देतो सांगून वेगवेगळ्या मोबाईल वरून फोन करून लिंक पाठवली. ही लिंक ओपन करताच फिर्यादी यांच्या पत्नीच्या अकाऊंटवरून 1 लाख 52 हजार 653 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.