चिपळूण:- चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे येथे मंगळवारी दोन कार व रिक्षामध्ये झालेल्या तिहेरी अपघातप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकूण 9 जण जखमी झाले असून यात दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दानीश नवाज मुकादम (पेठमाप) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर गुहागर-कोंडकारुळ येथील सुभाष कृष्णा अडूरकर (36), सिया सुभाष अडूरकर (29), सुरेंद्र सुधीर मोरे (31, वेळणेश्वर), अमान अजिम मुरुडकर (5), उर्वी विराज जाक्कर (20), प्रतिक प्रभाकर जाक्कर (24), रिया प्रतिक जाक्कर (21), रुद्र अनंत भारद्वाज (6), रिक्षा चालक संजय अनंत साबळे (कोंढे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
कार चालक दानीश मुकादम याच्यावर हयगयीने गाडी चालवून दोन गाड्यांचे नुकसान आणि 9 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.