रत्नागिरी:- शहरालगतच्या कुवारबाव गराटेवाडी येथे ड्रील मशिनने काम करत असताना शॉर्ट सर्किटमुळे भाजून जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा. गुरूसिद्दय्या कुडलय्या हिटनल्ली (48, ऱा विजापूर कर्नाटक सध्या शांतीनगर रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून कर्नाटक येथील रूग्णालयात उपचार करण्यात घेत होत़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूसिद्दय्या हे 11 मे 2023 रोजी कुवारबाव गराटेवाडी येथे ड्रील मशीनने काम करत होत़े. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गुरूसिद्दय्या हे भाजून गंभीर जखमी झाल़े. त्यांना प्रथम रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत़े. तसेच नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी कर्नाटक येथील रूग्णालयात दाखल केले होत़े. तेथील रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरूसिद्दय्या यांचा मृत्यू झाल़ा. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े.