पुणे:– सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.
एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तताही तेथेच करता येईल.
सध्या फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता अर्ज दाखल करण्यासाठी राज्य सरकारने ई- हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून दोन कोटींहून अधिक ऑनलाइन फेरफार नोंदविले आहेत. तर फेरफारपैकी केवळ साडेसव्वीस लाख नोंदी या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे झाल्या आहेत.