रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे जिह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नागरिकांनी सतर्कता व सावधानता बाळगणे गरजेचे आहे. 7 व 8 जुलै रोजी जिह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 9 जुलै रोजी पावसाचा येलो अलर्ट जाहिर करण्यात आला आहे.