रत्नागिरी:-रत्नागिरी मारुती मंदिर येथील के सी जैन नगर समोरील कमानीजवळ पाण्याच्या प्रेशरमुळे रस्ता फुटून पाणी वरती आल्याने रस्त्याच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पाण्याच्या प्रेशरमुळे रस्ता खचला होता. त्यानंतर जोरजोरात पाणी वाहू लागले. पाइपलाइन फुटल्याची माहिती नगर परिषदेत देण्यात आली. काही वेळाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून पाईप लाईन दुरुस्त करण्यात आली. यामध्ये जवळपास अर्धा तास पाणी वाया गेले.