रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बावनदी ते खारेपाटणदरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका देत दंड वसुली केली आहे. गेल्या जानेवारी ते जून 2023 या दरम्यान 9 हजार 503 वाहनचालक कचाट्यात सापडले.वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यापकरणी त्यांच्याकडून 78 लाख 52 हजार 350 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक शाखा, हातखंबा मदत केंद्राच्यावतीने वाहनधारकांवर निगराणी ठेवली जाते. महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालक या वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कचाट्यात पकडले जात असतात.जानेवारी 2023 ते जून 2023 या 6 महिन्यांच्या कालावधीत या विभागाने 9503 केसेस केल्या आहेत. हातखंबा केंद्राच्या या कार्यवाहीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर चांगलीच जरब बसणार आहे.
वाहनधारकांवरील केसेस आणि दंड वसुलीः
विनाहेल्मेटच्या 3339 केसेस आणि 16,69,500 रुपये दंड वसूल.
विनासीटबेल्टच्या 1173 केसेस, 2,37,600 रुपये दंड वसूल.
ओव्हरस्पिड ड्रायव्हिंगच्या 1441 केसेसमध्ये दंड 29,02,000 रु. दंड वसूल.
मोबाईलचा वापर 1 केस मध्ये 4 हजार रुपयांचा दंड वसूल.
ड्रंक अँड ड्राईव्ह ची 1 केस मध्ये 10 हजार रुपयांचा दंड वसूल.
विना इन्शुरन्सच्या 7 केसेसमध्ये 14 हजार रुपये दंड वसूल.
मालगाडीतून प्रवासी वाहतूक 35 केसेसमध्ये 17500 रुपयांचा दंड वसूल.
इतर केसेस 3506 मध्ये 29,98,350 रुपये दंड वसूल.