चिपळूण (ओंकार रेळेकर):- नुकत्यात झालेल्या क्लबच्या वार्षिक सभेत अध्यक्षपदि लायन अंजली कदम यांची सचिवपदी लायन सुप्रिया गुरव तर खजिनदारपदी लायन अक्षदा रेळेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अध्यक्षपदी निवड झालेल्या लायन अंजली कदम या अनेक माध्यमांतून समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असून विविध वर्तमानपत्रात त्यांचे वैचारिक लेख प्रसिद्ध होत असतात . हेल्प फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्ष असून अनेक वर्ष लायन सदस्य आहेत.
लायन्स क्लबची इतर पदे सांभाळण्या सोबतच क्लबच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळत आहेत . सेक्रेटरीपदी निवड झालेल्या लायन सुप्रिया गुर व यांनीदेखील लायन्स तसेच लायनेस संघटनेची सर्वोच्च पदे भूषविली आहेत . अनेक अँवॉर्डस ने त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे .त्या प्रसिद्ध ब्युटिशअन आहेत . खजिनदार लायन अक्षदा रेळेकर यांनी लायन्स संघटनेत अनेक पदांवर काम करून अनेक प्रांतीय तसेच मल्टीपल अॅवॉर्डस मिळवली आहेत . नामदेव शिंपी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत .सुप्रसिध्द गजानन क्लासेसच्या त्या मालक तसेच शिक्षिका आहेत.
यावेळी प्रथम उपाध्यक्ष म्हणून डॉ शमिना परकार तर द्वितीय उपाध्यक्ष लायन सोनल कारेकर यांची निवड करण्यात आली.
वार्षिक सभेच्या निवड प्रक्रियेसाठी क्लबचे सर्व सदस्य , कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व माजी लायन अध्यक्ष उपस्थित होते .