चिपळूण – येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबी चे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष तर्फे महाविद्यालयात कृषी दिन साजरा करण्यात आला.
या कृषी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षा तर्फे विद्यार्थिनींनी प्लास्टिक टाकाऊ डब्यांच्या विविध प्रकारच्या कुंड्या तयार करून त्यात झाडांची रोपे लावून महाविद्यालयामध्ये शिक्षकांना सुपूर्त केली .व विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन झाडांच्या विविध प्रकारच्या रोपे लावून कृषी दिन साजरा करण्यात आला.
महिला विकास कक्ष प्रमुख सौ. दिशा दाभोळकर व त्यांचे सहकारी यांच्या त्यांना मार्गदर्शन लाभले. या महिला विकास कक्षातील कार्यक्रमाला प्रा.सौ.लीला बिरादार ,प्रा.सौ.मृण्मयी सोहनी,प्रा.श्रीमती.सुचिता दामले, प्रा.सौ.अमिता कारंडे,सौ.प्राची राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापट सर, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.नामदेव तळप,पर्यवेक्षिका सौ.स्नेहल कुलकर्णी , रजिस्ट्रार श्री अनिलकलकुटकी यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले .या कार्यक्रमाला प्रा. शुभांगी इंगळे प्रा.ऋतुजा लोंढे उपस्थित होतत्या.विद्यार्थिनींच्या या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.